मतदान केंद्रांवर सुविधा देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करावी – जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) :- सार्वजनिक बांधकाम विभागाने मतदान केंद्रांवर आवश्यक ती सर्व सुविधा देण्याबाबत तसेच दुरुस्तीविषयक कामकाजाबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आढावा बैठक घेतली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आदी उपस्थित होते. क्षेत्रियस्तरावरुन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी काल जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांच्या पथकांना विधानसभा मतदार संघात आढावा घेण्यासाठी पाठविले होते. त्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. जिल्हाधिकारी म्हणाले, मतदारांचे मोबाईल मतदान करेपर्यंत ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. त्याबाबत टोकनही द्यावेत. एमआयडीसीमध्ये देखील तहसिलदारांनी तपासणी करावी. एफएसटी आणि एसएसटी मध्ये मनुष्यबळ वाढवले जाईल. उत्पादन शुल्क, एफएसटी, एसएसटी यांनी संशयित वाहनांची तपासणी करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृतीबाबत नियोजन काय केले आहे, त्याची माहिती द्यावी. तसेच प्रभावीपणे अंमलबजावणीही करावी. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, 400 गृहरक्षक दल मागवून घेण्यात येईल. त्यांचा विविध पथकांमध्ये तपासणीसाठी समावेश केला जाईल. तपासणी अधिकाधिक कडक करावी आणि अवैध गोष्टींना प्रतिबंध करा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनीही यावेळी सविस्तर माहिती दिली.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button