
कारची दुचाकीला धडक, तरूण जखमी
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर लोटे येथे अज्ञात कारने दुचाकीस्वाराला पाठून धडक दिल्याने या अपघातात शैलेश आंब्रे (रा. आवाशी) हा तरूण गंभीररित्या जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले.