कोसुंब येथील तरूणाचा पुण्यात अपघातात मृत्यू
रत्नागिरी ः कोसुंब येथे राहणारा अमोल चंद्रकांत जाधव या तरूणाचे पुणे येथे अपघाती निधन झाले. पुणे येथील खाजगी कंपनीत तो नोकरीसाठी होता. मे महिन्यातच त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर तो नोकरीसाठी पुन्हा पुणे येथे गेला होता. तेथे मोटरसायकलच्या अपघातात त्याचे दुःखद निधन झाले. अमोल हा जिल्हा बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव यांचा चिरंजीव होता