
क्रांतीनगर येथे जुन्या वादातून तरुणावर तलवारीचे वार; क्रांतीनगर रिक्षा स्टॉपनजिक घडला थरार
रत्नागिरी, ता. ०६ :
शहरातील क्रांतीनगर रिक्षा थांब्यानजिक जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. धारदार तलवारीने तरुणावर तीन वार करण्यात आले.
या हल्ल्यात विटकर (वय ३२, क्रांतीनगर) नामक तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या हातावर आणि पायावर वार झाले आहेत. हल्ला झाल्याच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला असून या हल्ल्यातून संबंधित तरुण थोडक्यात बचावला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. हल्ल्यानंतर जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस निरीक्षक श्री . सासने, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. वाघमारे व अन्य सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आज दुपारी काही जणा बरोबर दारू पित असताना वाद झाला होता.यातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे
www.konkantoday.com





