कोकणातील पाणी पूर्वेकडे वळविण्याचा सरकारचा डाव ः खा. सुनिल तटकरे यांचा आरोप
रत्नागिरी ः कोकणात येणारं पाणी अन्यत्र वळविण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. परंतु सरकारचा हा डाव आम्ही यशस्वी होवू देणार नाही, असा इशारा रायगड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
कोयना आणि मुळशी धरणातील पाणी कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र वळविण्यासाठी काय करावे लागेल यासाठी शासनाने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार हे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा सरकारचा डाव असल्याचा तटकरे यांनी आरोप केला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे कोकणातील पाण्याची समस्या तीव्र होईलच. शिवाय येथील जलविद्युत प्रकल्प बंद होतील असा दावाही तटकरे यांनी केला आहे.