
सिंधुदुर्गातील व्यापारी महासंघाची आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक ,खा. राऊत यांची मध्यस्थी?
सिंधुदुर्गातील २ ते ८ जुलै रोजीच्या लॉकडाऊनला व्यापारी संघाने तीव्र विरोध दर्शवत एक दिवसाचा बंद पुकारला. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांच्या मध्यस्थीने आज शुक्रवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकाऱ्यांची व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत कोणता निर्णय होणार ? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
www.konkantoday.com