
माशांची आवक घटल्याने मच्छीमार संकटात तर खवैय्ये नाराज
थंडीचा मोसम सुरू झाला असला तरी जिल्ह्यात मासळी बाजारात निराशाजनक चित्र आहे. नवीन हंगाम सुरू होऊन चार महिने लोटले तरी बदलत्या हवामानासह इतर कारणांमुळे माशांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्याचा फटका मच्छीमारांना बसत आहे.
पूर्वी किनारपट्टी भागात सुरमई, मोडोसासारख्या माशांची मुबलक उपलब्धता असायची मात्र आता या प्रजाती दुर्मीळ झाल्या आहेत. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यामुळे या महिन्यात मच्छीला मागणी कमी होणार आहे. त्यामुळे कमी माल येऊनही अपेक्षित उठाव होत नसल्याने मच्छीविक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
किनारपट्टीवर वाढलेले जलप्रदूषण, अनियंत्रित मासेमारी व त्यांच्या प्रजननकाळात होणारी मासेमारी ही कारणे पुढे आली आहेत. खोल समुद्रात मासेमारी करूनही अपेक्षित मासे जाळ्यात सापडत नसल्याने मच्छीमारांना मासेमारीसाठी होणारा डिझेल आणि मनुष्यबळांचा खर्चही काढणे कठीण झाले आहे.www.konkantoday.com




