सेंट्रल किचन मुळे पोषण आहार शिजवणाऱ्या बचत गटांना बसणार फटका
राज्यातील शहरी भागातील शाळांमध्ये सेंट्रल किचन पद्धतीद्वारे शालेय पोषण आहार वाटपाची अंमलबजावणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे.त्यामुळे शहर परिसरातील शाळांना पोषण आहार शिजवून देणाऱ्या बचत गटांना फटका बसणार आहे.रत्नागिरी शहरात पालिकेतर्फे निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याने पोषण आहार शिजवून देणारे महिला बचतगटांचा उत्पादनावर गदा आली आहे.रत्नागिरी शहर परिसरात नगर परिषदेच्या आणि माध्यमिकच्या एकूण सुमारे ३४ शाळांमध्ये शालेय पोषण आहार महिला बचत गटांमध्ये फिरून दिला जातो.त्यामुळे या बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले होते .पण आता शासन स्तरावर सेंट्रल किचन संकल्पना राबवण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी निविदा कार्यवाहीने पोषण आहार शिवून देण्याचा ठेका दिला जाणार आहे.
www.konkantoday.com