शिवसेनेला केंद्रात तीन मंत्रीपदे मिळणार? विनायक राऊतांचाही समावेश होणार?
रत्नागिरी ः नरेंद्र मोदी यांचा उद्या शपथविधी होणार असून महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्याने भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला यावेळी तीन मंत्रीपदे मिळतील अशी अपेक्षा आहे. गेल्या वेळी शिवसेनेला फक्त एकाच मंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी शिवसेनेला तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांचा समावेश होण्याचे वृत्त आहे. राऊत यांना तातडीने दिल्ली येथे बोलावण्यात आल्याने त्यांच्या समावेशाची शक्यता वाढली आहे. याशिवाय शिवसेनेकडून भावना गवळी, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रताप जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून कोणाची नावे सुचविली जातात याचीच उत्सुकता सर्वांना आहे.