गायीच्या पोटात तब्बल ३५ किलो प्लास्टीक दोर्या, चप्पल
चिपळूण ः लोटे येथे प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पकडलेल्या गायीच्या पोटात ३५ किलो प्लास्टीक दोर्या, चप्पल साचल्याने गाय मरण पावली. शवविच्छेदनाच्या वेळी पशुवैद्यकीय अधिकार्यांनी हा गोळा बाहेर काढला. भटक्या मोकाट गायी प्लास्टीक किंवा तत्सम पदार्थ खात असल्याने त्यांच्या मृत्यूच्या घटना घडत असतात.
लोटे येथे हिंसाचार झाल्यावर तेथील गाय व बैल संगोपनासाठी मुरादपूर येथील महावीर गोशाळेत ठेवले होते. या गायीचा गर्भपात झाल्याने तिची प्रकृती खालावली व ती मृत्यूमुखी पडली. तिचे शवविच्छेदन डॉ. धमणकर व डॉ. कांबळे यांनी केले. त्यावेळी हा प्लास्टीकचा गोळा बाहेर काढण्यात आला.