
अंतिम वर्षाच्या परीक्षां ५० मार्कांची आणि एक तासाची असेल -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरुंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी बैठक घेतली होती. परीक्षा कशा प्रकारे घेता येईल यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. राज्यपालांच्या कालच्या बैठकीनंतर कुलगुरुंच्या समितीने आपला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे सादर केला आहे.विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा तीन तासांची होणार नसून, ५० मार्कांची आणि एक तासाची असेल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया 31ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु आहे.ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस या तीन पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. या तीन पर्यायांपैकी प्रत्येक विद्यापीठ एक पर्याय निवडणार आहे. प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार आहे.
www.konkantoday.com