
रत्नागिरीत आर्ट वर्कशॉपचे आयोजन
उन्हाळ्याच्या सुटीत एका वेगळ्या आर्ट वर्कशॉपचे आयोजन डॉक्टर स्वप्नजा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे .फ्लुईड माध्यमातून चित्रकारी करणाऱ्या डॉक्टर मोहिते यांच्या पेंटिंगची पुणे मुंबई कोल्हापूर गोवा येथे विविध प्रदर्शने झाली आहेत डॉक्टर मोहिते यांच्या पेंटिंगची नेपल्स इटली येथे होणाऱया जागतिक स्तरावरील चित्र प्रदर्शनासाठी ही निवड झाली आहे.कलर स्प्लॅश वर्कशॉपच्या निमित्याने अॅक्रेलिक रंग वेगवेगळ्या प्रकाराने वापरून चित्रे करण्याचे प्रशिक्षण रत्नागिरीत प्रथमच अनुभवण्यास मिळणार आहे हा वर्कशॉप रविवार दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी तीन ते सहा या वेळात अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट मेहता क्लिनिक नाचणे रोड येथे होणार आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर मोहिते यांच्याशी ९५४५०३०६४२यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे