चिपळूण शिक्षण विभाग कायमस्वरूपी प्रमुखाविना


चिपळूण  येथील पंचायत समिती शिक्षण विभागाला अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी न मिळाल्याने या विभागाचा कारभार चालवण्याची जबाबदारी ’प्रभारी’ तत्वावर सुरू आहे. यापूर्वी पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी म्हणून प्रमोद शेंडगे यांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यांची परिवहन अधिकारी (आरटीओ) अधिकरी म्हणून निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा विभागाचा कार्यभार प्रभारी अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे.
२०१७ मध्ये सुर्यकांत पाटील हे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांची पदोन्नतीने बदली झाल्यानंतर हे पद पुन्हा प्रभारी झाले. विभागातील कामाच्या अतिरिक्त बोजामंळे प्रभारी पद स्वीकारण्यास अनेक विस्तार अधिकार्‍यांना नकोसे वाटत असते. – यामुळे गटशिक्षणाधिकारी नसल्याने – विभागातील दैनंदिन कामे ठप्प होऊ लागल्याने विभाग चांगलाच वादात सापडला होता. त्यावेळच्या पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत असे. यानंतर मात्र कोणाकडे तरी प्रभारी पदभार सोपवून हा विभाग चालवला जात असे. हीच प्रभारीची परंपरा आजही कायम आहे. सध्या दादासाहेब इरनाक यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. प्रभारीमुळे विभागातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात संबंधित अधिकार्‍यांची कुचंबणा होते.
प्रभारीमुळे प्रशासकीय कामे नियमित होत नसल्याची चर्चा सुरू आहे. विभागाच्या स्वरूपावर अधिकारी आणि शिक्षकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. विभागाची कार्यक्षमता व शाळांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारीची आवशकता आहे. तसेच प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी आणि महत्वाचे निर्णय वेळेवर होण्यासाठी पदभरती लवकर होणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button