
वन अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजपा महिला पदाधिकारी आंदोलन करणार
चिपळूणचे विभागीय वन अधिकारी यांच्याकडून रत्नागिरीच्या महिला परिक्षेत्र अधिकारी यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नाही. यामुळे या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी चिपळुणातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपा महिला प्रदेश चिटणीस निलम गोंधळी यांनी सांगितले आहे. याबाबत वनमंत्र्यांकडे ही दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com