
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर,मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 12 तासांपासून ठप्प
गेल्या काही तासांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे.तर मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 12 तासांपासून ठप्प आहे. कर्ली नदीला पूर आल्याने कुडाळ मधील पावशी महामार्गावर पाणी आल्याने मुंबई- गोवा रस्ते वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या आहेत. याशिवाय, मालपे पेडणे भागात दरड कोसळल्याने या भागातील वाहतूकही वळवण्यात आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची कोंडी झाली आहे. www.konkantoday.com