
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडीरत्नागिरी येथून चिरा घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून चालक ठार
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील जुळेवाडी (ता. शाहूवाडी) येथील खिंडीतील वळणावरील अरूंद मोरीवरून चिरा घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून ट्रकचालक रवींद्र शिवाजी चव्हाण (वय ३८, रा.शहापूर, ता. पन्हाळा) हा जागीच ठार झाला. काल सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात घडला. घटनेची नोंदी शाहूवाडी पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, काल सकाळी रवींद्र चव्हाण हा ट्रक (एमएच १० एक्यू ६३५१) मधून चिरा दगड घेऊन रत्नागिरीहून कोल्हापूरकडे निघाला होता. जुळेवाडी येथील वळणावर ट्रक आला असता अरूंद मोरीवरून ट्रक पुढे घेताना तो थेट दरीत कोसळला. त्यात चालक रवींद्र चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.