
बालकांना मद्य विक्री होवू नये म्हणून उत्पादन शुल्क खात्याकडून संबंधितांना सूचना जारी
पुण्यातील पोर्शे घटनेनंतर राज्या उत्पादन शुल्क विभागाने सगळीकडे सावधगिरीच्या सूचना जारी केल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १८ वर्षाखाालील मुलांना मद्य दिले जावू नये, अशा सूचना देखील बार चालक व परमिट रूम चालक यांना देण्यात आल्या आहेत. याचे पालन होते की, नाही याची तपासणी रात्री उशिरापर्यंत उत्पादन शुल्क निरीक्षक करत आहेत. जिल्ह्यातील २४० बार व परमिट रूम आहेत. अशी माहिती अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, पुणे येथील घटनेनंतर राज्यात सगळीकडे सावधगिरीच्या सूचना सरकाारने दिल्या आहेत. त्याचे पालन करावे अशी आठवण करून देण्यात आली आहे. www.konkantoday.com