
नगरपरिषदेने गणेश विसर्जनासाठी रत्नागिरी शहरातील तलावांची स्वच्छता करावी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येत्या गणेशोत्सवात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका न काढता गणेशमूर्तींचे विसर्जन घराजवळच तलावामध्ये अथवा कृत्रिम तलावांमध्ये करावे अशा सूचना दिलेल्या आहेत. तरी रत्नागिरी नगरपरिषदेने शहरातील सर्व तलावांमधील गाळ काढून तलावांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करावे तसेच तलावातील पायऱ्यांवर ब्लिचिंग टाकून शेवाळ काढून टाकावीत. विसर्जनाच्या दिवशी दुर्घटना घडू नयेत त्यासाठी सुरक्षाव्यवस्था तलावाच्या ठिकाणी ठेवावी. याबाबतचे उपायोजना आतापासूनच सुरू करावी असे आवाहन गणेश भक्तांकडून करण्यात येत आहे. या सूचनेची अंमलबजावणी गंभीरपणे करण्यात यावी आणि जिल्हा प्रशासनाने शांतता समितीच्या बैठकीत याचा आढावा घ्यावा असे सूचित करण्यात आले आहे.
www.konkantoday.com