
लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्या प्रकरणात चिपळूण तालुक्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता.
लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून ३.३२ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने पुराव्या अभावी राजेश पवार याची निर्दोष मुक्तता केली. सन २०१६ साली चिपळूण तालुक्यातील एका विवाहित महिलेने चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.राजेश पवार याने आपणास लग्नाचे वचन देत वारंवार संबंध ठेवले व जेसीबी एरेदीच्या नावाखाली रक्कम घेतल्याचा आरोप केला होता. मात्र या प्रकरणात जेसीबी खरेदीचा कोणताही दस्तऐवज किंवा व्यवहाराचा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नाही. तसेच कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही उपस्थित करण्यात आलेला नाही, या प्रकरणात आरोपीच्यातर्फे ऍड. फारूख म्हातार नाईक यांनी काम पाहिले.www.konkantoday.com