राजापूर तालुक्यातील पाचल जवळेथर आंबेवाडी रस्ता डांबरीकरणानंतर आठ दिवसांतच रस्ता उखडला


राजापूर तालुक्यातील पाचल जवळेथर रस्त्यांतर्गत तळवडे आंबेवाडी ते ताम्हाणे फाटा रस्त्याचे डांबरीकरण पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आले. मात्र आठ दिवसातच रस्ता उखडल्याने परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेली अनेक वर्षे नादुरूस्त असलेल्या १६०० मीटर लांबीच्या या रस्त्यावर पुरेशा प्रमाणात डांबराचा वापर न झाल्याने रस्ता जागोजागी उखडला आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी ठेकेदारांच्या व्यवस्थापकाला याबाबत विचारणा कली असता तुम्ही कुठेही तक्रार करू शकत नाही अशी उध्दट भाषा वापरून काम रेटण्याचा हा प्रकार करण्यात आला असल्याने संताप व्यक्त होत आहे. यावर प्रशासनाचा किंवा बांधकाम विभागाचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button