
अलिबाग कारागृहातील कैदी व कर्मचारी मिळून ६९ जणांना करोनाची लागण
अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करोनाने शिरकाव केला आहे. कारागृहातील कैदी व कर्मचारी मिळून एकूण ६९ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर नेऊली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.
अलिबाग मधील करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक करोना रुग्ण सध्या अलिबाग तालुक्यात आहेत.
www.konkanntoday.com