
रत्नागिरी नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, शहरात एकूण 69 मतदान केंद्रे

रत्नागिरी नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून उद्या सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी दिली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण 69 मतदान केंद्रे आहेत. 69 मतदान केंद्रांकरिता 345 कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, त्याचबराेबर इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. एकूण 69 मतदान केंद्रात 64546 मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये पुरूष मतदार 31324 तर महिला मतदार 33421 आणि इतर मतदार 1 असे एकूण 64546 मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज या ठिकाणी ईव्हीएम व मतदानाचे साहित्य वितरण करण्यात आले. हे साहित्य घेतल्यानंतर केंद्राधिकाध्यक्ष व मतदान अधिकारी तपासणी करतील व नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर हे साहित्य पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com




