
मत्स्य कृषी दर्जात मागण्यांचा विचार नाही, मच्छिमार कृती समिती.
राज्यातील मत्स्य व्यवसायाला पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यासाठी कृषीचा समकक्षी दर्जा देण्याचा निर्णय महिन्यापूर्वी घेण्यात आला. मात्र मच्छिमार कृती समितीने केलेल्या १५ पानी मागणी अहवालातील एकाही मागणीचा समावेश कृषि धोरणात करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली असून मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा ही निव्वळ फसवणूक आहे. यासंदर्भात आम्ही मत्स्य व्यवसाय मंत्र्यांना भेटून याची विचारणा करणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली.www.konkantoday.com