
चिपळुणात व्यापारी संघटना फुटली, काही व्यापार्यांनी नवीन चूल मांडली
चिपळूण व्यापारी महासंघात पडलेल्या फुटीनंतर तब्बल १२० व्यापार्यांनी एकत्र वेगळी चूल मांडली आहे. चिपळूण व्यापारी एकता या नावाखाली २३ व्यापार्यांची वेगळी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये समन्वय समितीबरोबरच ६ ज्येष्ठ व्यापार्यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. ही समिती व्यापार्यांच्या हिताबाबत तसेच अन्य विषयाबाबत वेळोवेळी निर्णय घेणार आहे. तसेच यापुढे चिपळूण व्यापारी महासंघटनेशी कोणताही संबंध राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.येथील व्यापारी महासंघटनेत गेल्या काही महिन्यांपासून मोठी धुसपूस सुरू होती. तसेच मध्यंतरी मोर्चा आणि बाजारपेठ बंदचा घेतलेला निर्णय अनेक व्यापार्यांना पटला नव्हता. त्यामुळे नाराजी उफाळली होती. त्याचवेळी ज्येष्ठ व्यापारी शिरीष काटकर यांच्या माध्यमातून काही व्यापार्यांनी वेगळा निर्णय घेण्याची हालचाल सुरू केली होती. त्या अनुषंगाने शहरातील चितळे मंगल कार्यालय सभागृहात नुकतीच १२० व्यापार्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी शिरीष काटकर, बाळा कदम, अरूण भोजने, सतीश खेडेकर, या ज्येष्ठ व्यापार्यांनी उद्देश आणि पुढील वाटचाली याबाबत भूमिका मांडली. www.konkantoday.com