चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक नाट्यगृहाचे ४ तासासाठी आता २२ हजार रुपये भाडे


चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार्‍या कार्यक्रमांना चार तासांसाठी २२ हजार रुपये भाडे करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच स्थानिक कार्यक्रमांना ११ हजार रुपये भाडे घेण्यासह राजकीय सभा, शासकीय कार्यक्रमांना येथे परवनागी देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. या सभेदरम्यान नमो उद्यान आपल्याच प्रभागात व्हावे यासाठी नगरसेवकांमध्ये चांगलीच स्पर्धा झाली. अखेर हा विषय नगराध्यांच्या कोर्टात गेला.
मंगळवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तालीम सभागृहात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी नाट्यगृह भाडेवाढीवर चर्चा करताना भाडेवाढ अनिवार्य असल्याचे मत अनेकांनी मांडले. यावर चर्चेअंती नाट्यगृहाबाबत वरील निर्णय घेण्यात आले.
नगर परिषदेचे शहरातील विविध भागात ३५ खोके असून त्यातील ७दिव्यांगांना तर अन्य इतरांना भाडेतत्वार दिले आहेत. त्यांचे नूतनीकरण व नव्याने खोके उभारणीला परवानगी हा विषय चर्चेला आला असता दिव्यांगांना दिलेले खोके तेच चालवतात की भाड्याने दिले आहेत. तसेच अन्य व्यक्तींनी ज्या व्यवसायासाठी खोके घेतले आहेत ते तोच व्यवसाय करतात की वेगळा असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले. याला उत्तरे देताना प्रशासनाच्या नाकीदम आला. अखेर प्रशासनाने सर्व खोक्यांची तपासणी करुन त्याचा अहवाल तयार करण्याचे व त्यानंतर दिव्यांग सोडून अन्य सर्वांची मोठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button