
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेतील जुना ब्रिटीशकालीन पूल वापराविना.
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावरील अखेरची घटका मोजणारा जुना ब्रिटीशकालीन पूल सद्यस्थितीत वापराविनाच पडला आहे. गेल्या ४ वर्षापासून पुलावरील रहदारीलाही ब्रेक लागला आहे. कचर्याचा खच अन धोकादायक स्थितीमुळे पादचार्यांकडूनही वापर बंद झाला आहे. पूल जमिनदोस्त होणार असून तसा पत्रव्यवहारही वरिष्ठ स्तरावर करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठांकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर हा पूल जमिनदोस्त करण्याची कार्यवाही होणार आहे.या पुलावरून दिवस-रात्र हजारो वाहने मार्गस्थ होत होती. हाच पूल अपघाताच्या दृष्टीने शापितच बनला होता. अनेक प्राणांतिक अपघातही घडले. १९ मार्च २०१३ मध्ये महाकाली आरामबसला झालेल्या भीषण अपघातात ३९ जणांना प्राण गमवावे लागले होते. या भीषण दुर्घटनेनंतर पूल खर्या अर्थाने चर्चेत येवून दुरूस्तीचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.www.konkantoday.com




