रिफायनरी परत आणा समर्थकांचा २० जुलैला भव्य मोर्चा

रत्नागिरी ः कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात येणार्‍या प्रकल्पाचे स्वागत करण्याच्या दृष्टीने कोकण जनकल्याण प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली आहे. नाणार प्रकल्पाच्याबाबत जनतेला वस्तुस्थिती समजावणे गरजेचे आहे. या प्रकल्पातून युरो-६ निकषाची पूर्तता करणारी इंधन तयार होणार असल्याने तो प्रदूषणमुक्त असेल हे वास्तव्यय जनतेला समजून देणे गरजेचे आहे. रत्नागिरी ग्र्रीन रिफायनरी याच नावाने प्रकल्पाची सकारात्मक ओळख जनतेला करून देण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभा राहिला तर एक ते दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल व या भागाचे राहणीमान उंचावून विकास साध्य होईल असे या प्रतिष्ठानचे मत आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व मतपेटीवरील लक्ष्य यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. मात्र नाणार परिसरातील जवळ जवळ ७ हजार एकर जमीन प्रकल्पाला देण्यासाठी जमीन मालक तयार आहेत. त्यामुळे रत्नागिरीत औद्योगिक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी नुकतीच रत्नागिरीमध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली व हा प्रकल्प परत आणण्याच्या दृष्टीने कृती आराखडा बनवण्यात आला आहे. यासाठी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कचेरीवर प्रकल्प समर्थकांतर्फे मोर्चा नेवून निवेदन देण्यात येणार आहे. या कोकण कल्याण प्रतिष्ठानच्या बैठकीला ’कोकण जनकल्याण प्रतिष्ठान’चे सचिव अविनाश महाजन, निमंत्रक कौस्तुभ सावंत, आनंद जोशी यांसह सर्वश्री महेंद्रशेठ जैन, उदय पेठे, दिनेश जैन, केशव भट, राजेश शेट्ये, राजेंद्रशेठ जैन, निलेश मलुष्टे, संतोष तावडे, प्रमोद खेडेकर, मनोज पाटणकर, दीपक साळवी, राजीव लिमये, सुहास ठाकूरदेसाई, राजेंद्रप्रसाद मसुरकर, अमोल लेले इत्यादी मान्यवर रत्नागिरीकर या सभेला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button