
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे मोबाईल टॉवरमधून दीड लाखांचे साहित्य चोरीस
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथील एअरटेल टॉवरच्या बंदिस्त फायबर रूमचे कुलूप तोडून दीड लाख रुपये किंमतीचे साहित्य लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुहास दत्ताराम चव्हाण (रा. गवाणे-गवळीवाडी, लांजा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
त्यानुसार ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११.५४ वाजण्यापूर्वी चोरट्याने कोणत्यातरी धारदार हत्याराने एअरटेल टॉवरचे गेट व बंदिस्त फायबर रूमचे कुलूप तोडून आतील दोन सिसको पेयटो एसटीएफ कार्डस लांबवली. या दोन्ही कार्डसची किंमत दीड लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.www.konkantoday.com




