
दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी शो बाजी करताना थार गाडी उलटली सुदैवाने जीवितहानी नाही
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे समुद्रकिनारी काल संध्याकाळी साडेचार च्या सुमारास एक थार गाडी क्रमांक MH12 XT 1788 समुद्राच्या पाण्यातून भरधाव वेगाने चालवल्यामुळे नियंत्रण सुटून उलटली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडी जेसीबीच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, वारंवार सूचना करूनही पर्यटक समुद्राच्या किनाऱ्यावर गाड्या भरधाव वेगाने चालवत असतात. त्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत आहे. या घटनेमुळे किनाऱ्यावर उपस्थित नागरिकांमध्ये मोठा संताप पसरला.
समुद्रकिनाऱ्यावर गाड्या घेऊन जाण्यावर तातडीने कडक बंदी घालावी.
नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करावी.नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी.अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.




