
शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा वृत्तपत्रात प्रसिध्द बातम्यांशी संबंध नाही. प्रभारी प्राचार्य गणेश बंगाळे यांचा खुलासा
रत्नागिरी, दि. 11):- ‘जिल्ह्यातील 2 पदवी व 1 पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांची मान्यता धोक्यात’, अशा मथळ्याखाली काल १० सप्टेंबर रोजी काही वृत्तपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. या बातमीशी शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय रत्नागिरी चा संबध नसल्याचा खुलासा प्रभारी प्राचार्य गणेश बंगाळे यांनी केला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाचे पत्र क्र.2/पदवी मा.प्र./फार्मसी संस्था तपासणी/2025/748, दि. 26 ऑगस्ट 2025 अन्वये शैक्षणिक वर्ष 2022-23, 2023-24 व 2024-25 मध्ये मान्यता देण्यात आलेल्या मात्र पडताळणीअंती नकारात्मक शिफारस असलेल्या बी फार्म संस्थांना शासन निर्देशानुसार सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय यांच्यामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या 48 संस्थांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.
या यादीमध्ये शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी याचा समावेश नाही. तसेच या महाविद्यालयामध्ये फक्त पदवी अभ्यासक्रम असून, पदविका अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या कार्यकक्षेत नसल्याने वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी शासकीय औषधनिर्माणशास्त्र रत्नागिरीचा कोणताही संबंध नाही.
000




