
रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या “मोटोहाउस”ला माजी आमदार बाळ माने यांची सदिच्छा भेट
रत्नागिरी : केएडब्ल्यू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड (केव्हीएमपीएल) चा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या “मोटोहाउस”ला माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी भेट देऊन सुरेख मोटर्सचे श्रेयस सावंत यांना शुभेच्छा दिल्या.
सुरेख मोटर्स रत्नागिरी यांच्या भागीदारीतून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्सची प्रीमियम श्रेणी आता रत्नागिरीकरांसाठी उपलब्ध झाली आहे. या नव्या डीलरशिपचे उद्घाटन काल (७ सप्टेंबर) मोठ्या थाटात करण्यात आले. श्रेयस सावंत यांचे वडील (कै.) संतोष सावंत हे मिऱ्या सोसायटीचे माजी चेअरमन होते. तसेच श्रेयस यांचे आजोबा (कै.) मनोहर सावंत आणि बाळ माने यांचे वडील (कै.) यशवंत माने यांचे कौटुंबिक स्नेही होते.
श्रेयस सावंत यांनी सुरेख मोटर्सच्या माध्यमातून सुरू केलेल्या या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार बाळ माने यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि स्वकष्टाने पुढे जाऊ पाहणाऱ्या या नवउद्योजकाचे कौतुकही केले.