
शिरगांव मयेकरवाडी अंगणवाडी मध्ये बालगोपाळांनी दहीहंडी साजरी केली

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 बिट कोतवडे 1अंगणवाडी केंद्र शिरगांव मयेकर वाडी आज शिरगांव मयेकरवाडी अंगणवाडी मध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली या दहीहंडीला विशेष करून पोषक घटक असलेले पदार्थ शेंगदाणे लाडु, शेंगदाणा चिक्की, चुरमुरा लाडु, फळे आणि फुगे लावुन दहीहंडी सजविण्यात आली मुलांना पोषक आहाराचे महत्व समजवण्यासाठी हा उपक्रम अंगणवाडी मध्ये दरवर्षी घेतला जातो असे अंगणवाडी सेविका ममता मनोहर गावडे यांनी सांगितले सर्व मुलं कृष्णाचे सवंगडी यांची वेशभूषा परिधान करून आली आणि सर्व बालगोपाल यांनी श्रीकृष्ण चा जल्लोष करत हि दहीहंडी लहान कृष्ण सोहम परेश मयेकर याने फोडली दहीहंडी सजावट करण्यासाठी अंगणवाडीतील वाडीतील माझी विदयार्थी यांनी मदत केली तसेच अंगणवाडी च्या नुकत्याच हजर झालेल्या मदतनीस सान्वी सुमित कांबळे आणि पालक यांचे सहकार्य खुप छान लाभले.





