छत्रपती पुरस्कार प्राप्त कॅरमपटू आकांक्षा उदय कदम हिला जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर

शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळ्यात पुरस्काराचे वितरण

रत्नागिरी : छत्रपती पुरस्कार प्राप्त, आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू आकांक्षा उदय कदम हिची क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२४-२५ मधील गुणवंत (महिला) थेट पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्या (१५ ऑगस्ट) रोजी सकाळी ८ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, रत्नागिरी येथे होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींसह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button