
रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट वाटूळ मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली
*रॅलीस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट वाटूळ* तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या संस्थेचे शैक्षणिक वर्ष 2025-26 चालू असून *महाराष्ट्र शासनाचा* *डीएमएलटी* हा कोर्स चालू आहे या संस्थेमध्ये वर्षाचा सर्वात प्रथम सण म्हणून *गुरुपौर्णिमा* साजरी करण्यात आली यावेळी विद्येची देवता सरस्वती मातेचा आशीर्वाद घेऊन पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला *प्रमुख पाहुणे* म्हणून *प्राध्यापक मिलिंद दातार* यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ अंजली पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला यामध्ये सर्व मुलांनी गुरु महात्म्य सांगितले त्याचप्रमाणे *संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णा पवार* आणि त्यांचे सहकारी महिंद्र सावंत यांनी गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी काही महत्त्वाचे सल्ले देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्राध्यापक दातार सर यांचे मार्गदर्शन होते यामध्ये स्वतःचा वैयक्तिक विकास कसा करावा त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत बाहेरच्या जगात उद्योजकतेमध्ये कसे टिकून राहिले पाहिजे व त्यासाठी भाषेवर कसे नियंत्रण हवे या सर्व गोष्टींची माहिती व मार्गदर्शन श्री दातार सर यांनी केले त्याचप्रमाणे मुलांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आदर्श विद्यामंदिर वाटुळ या *संस्थेचे संस्थापक श्री विजय चव्हाण* सर व मुख्याध्यापक संदीप मयेकर सर यांनीही उपस्थिती दर्शवली व मुलांना गुरुपौर्णिमेच्या व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यानंतर मुख्याध्यापिकासो अंजली पवार यांनी *गुरु हे एक कडू औषध* *आहे आणि ते औषध आपले सगळे* *आजार दूर करतो* असा मोलाचा सल्ला दिला व अध्यक्षपदीचे शेवटचे भाषण संपून कार्यक्रमाची समाप्ती झाली