
हर्णेत नव्याने विकास केंद्र स्थापन होणार, ग्रीन फिल्ड मार्गाची व्यवहार्यता वाढण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल.
राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने जून महिन्यात काढलेल्या अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील देवके-दापोली आणि दोडावन-गुहागर, आंबोळगड- राजापूर येशील परिसरात विकास केंद्राच्या व्याप्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर हर्णे येथे नव्याने विकासकेंद्र स्थापित करण्याचे शासनाने ठरवले आहे. यामुळे सबंधित ग्रामपंचायतींचे अस्तित्व कायम राहणार असले तरी प्रत्यक्षात विकासकामांचे नियोजन व मार्गी लावण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळावर येऊन पडली आहे.दापोली तालुक्यातील देवके विकास केंद्राची यापूर्वी घोषणा झाली होती. त्यामध्ये किन्हाळ, देवके, चंडिकानगर, बुरोंडी, टोलेश्वरनगर, शितलनगर, महामायानगर या गावांचा समावेश होता. आता अलिकडे काढलेल्या अधिसूचनेमध्ये दापोली तालुक्यातील १३ आणि गुहागर तालुक्यातील पाच गावांच्चा समावेश करण्यात आला आहे. लाडघर, तामसतिर्थ, करजगाव, कोळथरे, बोरीवली, पंचनदी, दुमदेव, वणौशीतर्फे पंचनदी, आघारी, दाभोळ, मुरुड, कर्दे, चंद्रनगर या दापोली तालुक्यातील गावांचा समावेश आहे. गुहागर तालुक्यातील पेठ अंजनवेल, घरटवाडीतर्फ वेलदूर, मौजे अंजनवेल, कातळवाडीतर्फ अंजनवेल, रानवी यांचा समावेश आहे.गुहागर तालुक्यातील दोडावन विकासकेंद्रामध्ये यापूर्वी मुसलोंडी, नरवण, चिंद्रावने, वाघांबे, दोडवली, कर्डे या गावांचा समावेश होता. आता नव्याने काढलेल्या अधिसूचनेमध्ये आणखी ३५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही गावे कुंभारवाडी तर्फ पालपेणे, पालपेणे, वाकी, तळ्याची वाडी तर्फ पालपेणे, जानवळे, चिखली, मांडवकरवाडी, कोंडवाडी तर्फ पाटपन्हाळे, शृंगारतळी, वरवेली, मळण, पालशेत, मारुतीमंदिरवाडी, अडूर, नागझरी, कोंडकारूळ, वेळणेश्वर, वडद, उमराठ, साखरीआगर, हेदवी,उमराठ खुर्द, जांभारी खुर्द, तवसाळ खुर्द, काताळे, जांभारी, पडवे, तवसाळ, माटलवाडी, कुडली, बंदरवाडी, पाटीलवाडी, असगोली, रोहिले अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे.www.konkantoday.com