
सेतूच्या कारभारावर कुणाचे नियंत्रण, शिक्का मारण्यासाठी गर्दी पण अधिकारी जागेवर नाहीत
शाळा कॉलेजेस सुरू झाल्यामुळे अनेक कामांसाठी नागरिकांना विविध दाखले मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात जावे लागत आहे त्यामुळे या कार्यालयात सकाळपासूनच रांग लावावी लागत आहे मात्र अनेक कामे सेतू कार्यालया मार्फत होत असल्यामुळे नागरिकांना थांबत राहावे लागत आहे आज सुद्धा शिक्का मारण्यासाठी सकाळी साडेदहाची वेळ असताना देखील अधिकारी अकरा वाजायला आले तरी जागेवर नसल्याचे चित्र दिसत होते त्यामुळे नागरिकांच्या संतापाचे वातावरण होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालयाची वेळेत उपस्थित न राहणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता मात्र सेतू कार्यालय हे महसूल खात्याच्या संघटनेच्या अधिपत्याखाली चालवले जात आहे त्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या दौऱ्यात सेतू कारभाराचा आढावा घ्यावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे