
वाळू मिळत नसल्याने प्रधानमंत्री आवास घरकुलांची बांधकामे रखडली.
रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण किंवा इतर आवास योजनेचे सुमारे १५ हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यात रत्नागिरी तालुक्याचा विचार केल्यास जवळजवळ बाराशे ते तेराशे घरकुले आता प्रस्तावित आहेत. काहींची कामे सुरू आहेत, पण त्यांना शासनाकडून मोफत मिळणारी ५ ब्रास वाळू अजूनही मिळाली नाही. परिणामी विविध योजनांतील घरकुलांची बांधकामे थांबली आहेत.शासनाच्या या धोरणामुळे एका बाजूला लाखो रुपयांचा महसूल बेकायदेशीर वाळू उत्खनन करून बुडवला जातोय आणि दुसर्या बाजूला मात्र घरकुलांना एकही वाळूचा कण मिळत नाही.
शासनाने आवास योजनांतील घरकुलांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. पण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर वेगवेगळ्या योजनेखाली लाभार्थ्यांची घरकुले बांधण्यात येत आहेत. काही घरकुले प्रगतीपथावर आहेत त्यांना जिल्ह्यामध्ये वाळू उपलब्ध होत नसल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे.www.konkantoday.com