
आता पत्ता शोधण्यासाठी पिनकोड ऐवजी डिजिपीन.
घरी डिलिव्हरी मागवणार असाल, कुणाला पार्सल पाठवणार असाल किंवा पत्र लिहिणार असाल तर आता पिन कोडची आवश्यकता नाही. भारतीय टपाल विभागाने डिजिपिन सेवा सुरू केली आहे. जी तुमच्या स्थान निर्देशांकावर आधारित डिजिटल पीन कोड तयार करेल. त्यामुळे देशातील कोणत्याही कोपर्यातला पत्ता शोधणे अगदी सोप होणार असून कुरिअ किंवा पार्सल योग्य पत्त्यावर जाण्यास मदत होणार आहे, अशी माहिती रत्नागिरीतील डाक अधीक्षक ए.डी.सरंगळे यांनी दिली.www.konkantoday.com