
खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक-जोशीवाडी येथे एका १६ वर्षीय युवकाची रेल्वेखाली झोकून आत्महत्या
खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक-जोशीवाडी येथे एका १६ वर्षीय युवकाने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २९ जून रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
अंकुश मनोहर जोशी (वय १६, रा. कळंबणी बुद्रुक-जोशीवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कळंबणी बुद्रुक-जोशीवाडी येथील रेल्वेफाट्यावजवळ ही घटना घडली. समोरून येणाऱ्या ट्रेनखाली त्याने अचानक उडी घेतल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोमवारी (३० जून) सायंकाळी उशिरा खेड पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.