
राजापूर बाजारपेठेतून दुचाकी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी
राजापूर तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी रात्री शहरातल बाजारपेठेतून दुचाकी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन तरूणांना काही जागरूक नागरिकांनी हटकल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसल्याचे पुढे आले आहे.
गेल्या महिनाभरात ४ दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या प्रकरणात चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तालुक्यातील नाटे, कोदवली आणि कोंडये या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता तर दुचाकी चोरट्यांनी आपला मोर्चा शहराच्या दिशेने वळविल्याचे दिसत आहे. रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकंभोवती दोन तरूण संशयास्पदरित्या उभे होते. त्यांच्या संशयित हालचालींवरून ते चोरीच्या उद्देशाने उभे असावे असा संशय आला. काही जागरूक नागरिकांनी त्यांना हटकले असता दोघांनी धूम ठोकली. त्यामुळे दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला आहे. दरम्यान आतापर्यंत चार दुचाकी चोरीस गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.www.konkantoday.com




