
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण टप्प्यातील ४० टक्के झाडे मृत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील – चिपळूण टप्यातील परशुराम ते खेरशेत या ३४ कि.मी. टप्यात गतवर्षी करण्यात आलेल्या वृक्षलागवडीतील वास्तव आता समोर आले आहे. सोमवारी कंत्राटदार कंपनी ईगलचे अधिकारी आणि पर्यावरणप्रेमींनी केलेल्या पाहणीत लागवडीतील अवधी ४० टक्केच झाडे जगली असल्याचे दिसून आले. येत्या १५ जुलैपर्यंत मृत झालेल्या वृक्षांच्या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन अधिकार्यांकडून देण्यात आले.महामार्गावरील चिपळूण टप्प्यात शहरातील १८४० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सोडले तर या टप्प्यातील चौपदरीकरणाचा प्रवास सुस्साट झाला आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झालेल्या ठिकाणच्या वृक्षलागवडीचा विषय गाजत आहे.www.konkantoday.com