
केमिकलयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी ’साफयिस्ट’च्या उत्पादन बंदला तात्पुरती स्थगिती.
चिपळूण तालुक्यातील कामथे घाट परिसरातील नदीत टँकरव्दारे केमिकलयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी गाणे-खडपोली येथील साफयिस्ट कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले होते. मात्र कंपनीने दहा दिवसांची मुदत मागितल्याने या कारवाईला एमपीसीबीकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
कंपनीचा पाणी पुरवठा व वीज पुरवठा पुढील दहा दिवसांसाठी तोडू नये, असा पत्रव्यवहारही एमआयडीसी व महावितरण कंपनीकडे करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर ज्या टँकर चालकाने हे पाणी बेफिकरीने नदीत सोडले तो टँकर चालक, मालक अजून मोकाट असल्याचे दिसून येत आहे. कामथे गावातील हरेकरवाडी येथील नदीत काही दिवसांपूर्वी रात्री साफयिस्ट कंपनीचे केमिकलचे पाणी सोडताना पाच टँकर आढळून आले.www.konkantoday.com