
रत्नागिरी जिल्ह्यात पाच नवीन गोदामे मंजूर, मात्र निधीच उपलब्ध नाही.
जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रस्तावित पाच गोदामे बांधकामासाठी ११ कोटी ५२ लाखांच्या निधीकरीता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र अद्याप राज्य शासनाकडून निधी उपलब्धच न झाल्याने काही मोजक्याच गोदामांवर जिल्ह्याचा भार येवू लागला आहे.दोन वर्षापूर्वी खेड तालुक्यातील गोदाम कोसळल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाकडून नवीन गोदामाच्या बांधकामासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार खेड तालुक्यासाठी ५०० मे. टन क्षमतेची दोन गोदामे तसेच मंडणगड तालुक्यासाठी १ हजार ८० मे. टन क्षमतेचे एक गोदाम, लांजासाठी १ हजार ८० मे. टन क्षमतेचे एक आणि गुहागर तालुक्यासाठी १ हजार ८० मे. टन क्षमतेचे एक अशा एकूण पाच गोदामांसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता.www.konkantoday.com