एकनाथ शिंदे यांच्या वर विनायक राऊत यांनी केलेल्या अपमानास्पद टीकेमुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक, शिंदे गटाकडून त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची भूमिका


पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या अपमानास्पद टीकेमुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. विनायक राऊतांच्या टीकेनंतर शिंदे गटाकडून त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची भूमिका घेतली.मात्र, पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आधीच रोखलं. आगामी निवडणुकीआधी शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापलंय. विविध शहरातील महापालिका निवडणुका शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेसाठी असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाने जोरदार तयार केली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने वर्धापनाच्या दिवशी शक्तिप्रदर्शन केलं. याचदरम्यान राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. या टीकेवरून शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाने थेट विनायक राऊत यांच्या वाकोल्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची भूमिका घेतली.शिंदे गटाकडून विनाय राऊत यांच्या विरोधात त्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. या आंदोलनाची कुणकुण वाकोल्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना लागली. त्यानंतर ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते विनायक राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले. दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे वाकोला पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना वाकोला पोलीस ठाण्याजवळ रोखलं. यावेळी शिंदे गटाकडून विनायक राऊत यांचा निषेध करण्यासाठी तृतीयपंथीयांना देखील बोलवण्यात आलं. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका देखील करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button