
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण. युवकांनी 27 जूनपर्यंत अर्ज करावेत.
रत्नागिरी, दि.16 ) : जिल्ह्यातील मच्छीमार युवकांसाठी सहा महिने मुदतीचा सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम 1 जुलैपासून सुरु होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी युवकांनी 27 जूनपर्यंत येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पेठकिल्ला येथे अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्यव्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.*प्रशिक्षण कालावधी 1 जुलै ते 31 डिसेंबर 2025 (6 महिने) असणार आहे. यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे. ( आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे ). उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे ).क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.(विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.)प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह रु.450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र. तर दारिद्र रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु. 100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.600/- मात्र असेल.(दारिद्र रेषेखालील असल्यास ग्रामसेवक/गटविकास अधिकारी पं.स. सांचा दाखला जोडावा) विहीत नमुन्यातील अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरुन त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घेऊन दि. 27 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी whatsapp क्रमांक किंवा ई-मेल द्वारे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जी. द. सावंत, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी,पेठकिल्ला, रत्नागिरी, ता. व जिल्हा- रत्नागिरी, पिन – 415612. ई-मेल आयडी ftcrtn@gmail.com, मोबाईल व whatsapp क्रमांक 9422371901 येथे संपर्क साधावा.000