बालवाडी, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी भारत शिक्षण मंडळाची नवीन भव्य इमारत सज्ज.

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूल येथे नवी इमारत विद्यार्थ्यांसाठी सज्ज झाली आहे. या इमारतीची वास्तुशांत नुकतीच करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी आणि सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. नव्या इमारतीमध्ये गो. भ. बियाणी बालमंदिर, आगाशे कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर आणि गुरुवर्य रामचंद्र जोग संजीवन गुरुकुलचे वर्ग एकाच वेळेत भरणार असून येथे तीन प्रशस्त सभागृहसुद्धा आहेत.

शाळेच्या पूर्वीच्या कीर सभागृहाच्या जागेवर ही नवी इमारत उभी राहिली आहे. ३३००० चौरस फुटांचे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये ३४ खोल्या ३ सभागृह आहेत. प्रशस्त, मोकळी, हवेशीर आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. गुरुवर्य (कै.) अच्युतराव पटवर्धन आणि (कै.) शंकरराव पटवर्धन या बंधुद्वयींनी प्रामुख्याने विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत शिक्षण मंडळाची स्थापना केली. कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेला १२३ वर्षे झाली आहेत.संस्थेत के. जी. ते पी.जी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.

.जुन्या इमारतीची नव्याने पुनर्बांधणी करून प्रशस्त, हवेशीर वर्गखोल्या देणे तसेच नवीन इमारत बांधून अद्ययावत सोयीसुविधा देणे याकरिता संस्थेने मोठी इमारत उभी केली. एकाच शैक्षणिक संकुलामध्ये सुसज्ज इमारती, प्रयोगशाळा, ग्रंथालय, विस्तीर्ण क्रीडांगण, ए. व्ही. रूम, संगणक कक्ष व एकूण ३१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.वास्तुशांती कार्यक्रमाचे यजमानपद सहकार्यवाह संजय जोशी व सौ. जोशी यांनी यजमानपद भूषवले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, उपाध्यक्ष डॉ. अलिमियॉं परकार, कार्याध्यक्ष सौ. नमिता कीर, देणगीदार रमेश कीर, माजी जि. प. अध्यक्ष व माजी विद्यार्थी राजाभाऊ लिमये, माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी तसेच कार्यवाह सुनील वणजू, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, चंद्रकांत घवाळी, सदस्य विनायक हातखंबकर, संतोष कुष्टे, राजेंद्र कदम, स्वीकृत सदस्य विजय वाघमारे, देव, घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. मधुरा पाटील, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, गुरुकुल प्रमुख सौ. मनाली नाईक, कृ. चिं. आगाशे विद्यांमदिरच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी रविंद्र साखरपेकर आदींसह सर्व शिक्षक, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button