
रत्नागिरी जिल्ह्यात ’कार्गो’ वाहतुकीतून ११६ कोटींचा महसूल
रत्नागिरी जिल्ह्याच्या किनार्यावरील मोठ्या बंदरात कार्गों वाहतुकीची रेलचेल अलिकडच्या काळात वाढली आहे. बेथील जयगड, फिनोलेक्स, आंग्रे पोर्ट, जेएसडब्ल्यू, हर्णे, गुहागर, अशा मोठ्या बंदरातून गेल्या वर्षभरात सुमारे ३५ लाख ८४ हजार मेट्रीक टन कार्गोची वाहतूक झाली. त्या माध्यमातून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला नुकत्याच संपलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ११६ कोटीचा महसूल मिळाला आहे. २०२३-२४ मध्ये हे उद्दिष्ट ११० कोटी इतके साध्य झाले होते. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जयगड, फिनोलेक्स, आंग्रे कोर्ट जेएसडब्ल्यू, हर्णे, गुहागर, अशी मोठी व्यावसायिक बंदरे आहेत दरवर्षी या बंदरांवर मोठ मोठ्या कार्गों जहाजांच्या माध्यमातून विविध मालाची वाहतूक होत असते. रसायने, एलएनजी, कोळसा, पिव्हिसाचा कच्चा माल, आदी आयात केला जातो आणि तो बंदरावर तो उतरला जोता. बंदरावर उतरवल्या जाणार्या मालाची मेरीटाईम बोर्डाकडून पूर्ण तपासणी केली जाते. त्यानतर त्या मालावर टनामागे ३५ रुयपे या प्रमाणे बंदर वापर शुल्क आकारणीतून मेरीटाईम बोर्डाला महसुल प्राप्त होत असतो. येथील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने या आर्थिक वर्षातील बंदर वापर शुल्काच्या माध्यमातून शंभर ट्क्के उद्दिष्ट पूर्ण केले असल्याचे मेरिटाईम बोर्ड अधिकारी के संदीप भुजबळ यांनी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात ११६ कोटीच्या महसुलाचे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केले वर्षभरात सुमारे ३५ लाख ८४ हजार मेट्रीक टन आलेल्या कच्च्या मालाच्या माध्यमातून हा महसूल मिळाल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com