
कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर कोकणा बाहेरील शेतकरी
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर चार प्रगतशील शेतकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे .मात्र हे चारीही शेतकरी कोकणाबाहेरील आहेत यामुळे कोकणात प्रगतशिल शेतकरी नाहीत की काय ?असा प्रश्न निर्माण झाला आहे कोकण कृषी विद्यापीठाने आचारसंहिता लागण्याआधी कार्यकारी परिषदेवर चार प्रगतीशील शेतकऱ्यांचे नेमणूक केली त्यामध्ये असलेले प्रगतीशील शेतकरी परभणी, औरंगाबाद, अहमदनगर व जळगाव येथील आहेत आता हे शेतकरी कोकणातील पिकाबाबत कशा सूचना व मार्गदर्शन करू शकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे कृषिमंत्र्यांच्या शिफारशीने या नेमणुका झाल्याचे कळते याबाबत कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार संजय कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे या बाहेरील शेतकऱ्यांना काळे झेंडे दाखवून बैठकीला बसू देणार नाही असा त्यांनी इशारा दिला आहे .
www.konkantoday.com