
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळेत ३० वर्षीय तरूणाचा आकस्मिक मृत्यू.
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे हनुमाननगर येथील ३० वर्षीय तरूणाचे आकस्मिक निधन झाले. ही घटना ८ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. अभिषेक संजय चव्हाण असे या मृत तरुणाचे नाव आहे. अभिषेकला रविवारी सकाळी श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागल्याने त्याला उपचारासाठी प्रथम खासगी व नंतर जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. जिल्हा रूग्णालय येथे अभिषेक याला मृत घोषित करण्यात आले, अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे.www.konkantoday.com