
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
अकरावीसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.
राज्यामध्ये नोंदणी झालेल्यांपैकी १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क जमा केले आहे. तर अर्ज भाग एक पूर्ण भरून प्रवेश लॉक केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ लाख ५ हजार १६२ इतकी आहे. अर्ज भाग दोन पूर्ण भरून प्रवेश लॉक केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ लाख २९ हजार ९२४
इतकी आहे. नियमित फेरीसाठी ११ लाख २९ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.
प्रवेशाचे वेळापत्रक
८ जून – सर्वसाधारण गुणवत्ता फेरी
९ ते ११ जून – प्रत्यक्ष प्रवेश
१० जून – कॅप फेरी
११ ते १८ जून – प्रत्यक्ष प्रवेश